मला नेहमी लिंगाच्या ताठरतेबाबत अनेकदा प्रश्न विचारतात पुरुषांच्या लिंग ताठरते विषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात.
पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. मनामध्ये लैंगिक भावना/इच्छा जागृत झाल्यावर वा लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टोस्टेरॉन (Testosterone ) या विशिष्ट संप्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते. ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक व स्वाभाविक आहे.
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणतणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिच्छा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.
सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. नियमित व्यायाम करणे जसे की, सायकल चालवणे, पळणे, पोहणे, एरोबिक्स, इ. आणि निरोगी आहार घेणे यासारख्या निरोगी जीवनशैलीचा नक्कीच उपयोग होतो.
सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.
लिंगाच्या ताठरतेबाबत समस्या असल्यास ताण, चिंता, लैंगिक संबंधामध्ये अडचणी वा लैंगिक आयुष्याबाबत असमाधानी व स्वत: बद्दलचा आदर कमी होणे अशा समस्या सोबत जाणवायला लागतात. अशावेळी वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
हृदयरोग, रक्तवाहिन्या कडक होणे, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टरॉल, मधुमेह, लठ्ठपणा, पार्किन्सन रोग, मल्टीपल स्क्लेरोसिस (एमएस), यकृत किंवा मूत्रपिंडाचा आजार, इ. शारीरिक समस्या तसेच बराच काळ तंबाखू, दारु, अल्कोहोल, मादक द्रव्यांचे सेवन, पाठीचा कणा वा जननेंद्रियाच्या भागात झालेली जखम वा आघात, प्रोस्टेट ग्रंथीच्या समस्या असल्यास त्याचा परिणाम लिंगाच्या ताठरतेवर होतो.
लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या
जिथे तरुणाईला आपले मन मोकळे करता येईल आणि कुठलीही भीती न बाळगता मदत मागता येईल! अन हे ही संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क
ज्याना प्रत्यक्ष भेटायच आहे ते आपॉइमेंट घेऊन आमच्या पुण्यातील क्लिनिक ला भेट देऊ शकता.
सहारा आयुर्वेदा, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा