याला फिमोसिस (phimosis) म्हणतात. वय वाढत असतांना ती त्वचा हळूहळू ढीली होऊ लागते व पुढे चालून लिंगात ताठरपणा आला की ती मागं सरकते. नैसर्गिकता वय 18 पर्यंत सहसा चामडी मागे व्हायला लागते, किंवा नाहीच झाली तर हस्तमैथून करण्याने होऊन जाते. पण पुढे 23,26 वय वर्षांपर्यंत सुद्धा तुमच्यात हा बदल होत नसेल तर डॉक्टरकडे जावे. एकतर ते काही क्रीम देतील किंवा मग काही गोळ्या, औषधी. नाहीतर मग शस्त्रक्रिया हा त्यावरचा शेवटचा उपाय.
अनेक जण ज्यांना फिमोसिस असते ते याकडे दुर्लक्ष करतात पण प्रौढ झाल्यावर पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवतांना मग त्यांची ती चामडी संबंध ठेवतांना फाटते व त्यामुळे रक्तस्राव होऊन खूप वेदना होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा