आपण आजच्या लेखात वाचणार आहोत चाळिशी नंतर चे कामजीवन कसे असते?...आता यापुढे सेक्स बंद करायचे का ?...याला म्हातारचळ म्हणायचे का ?.. स्त्रीच्या कामजीवनातील बदल कसे असते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेख मोठा होईल पण सविस्तर वाचा.
वयाच्या चाळिशीनंतर स्त्रीपुरुषांना कामजीवनाचे फारसे आकर्षण नसते असा तरुणांमध्ये एक गैरसमज असतो. घर छोटे असले, वन बेडरूम फ्लॅट असला तर शयनगृह नवविवाहित दांपत्यासाठी असते. स्वयंपाकघरात आईने झोपायचे आणि बाल्कनीत बाबांनी झोपायचे. रात्रभर आई-बाबांची ताटातूट!
इतरही अनेक गैरसमज अस्तिवात आहेत. उदा. कामजीवन फक्त पुनरुत्पत्तीसाठी असते, कामजीवन फक्त तरुण-तरुणींसाठी असते, दोन मुले झाली की कामजीवन बंद वगैरे.
वस्तुस्थिती अशी की कामजीवन जीवनाच्या अखेरपर्यंत साथ देत असते. वयानुसार व वृत्तीनुसार कामजीवनात फरक पडत जातो. कोणत्याही दोन व्यक्तींचे कामजीवन समान नसते. स्त्री व पुरुष याच्या कामजीवनातही फरक पडतो.
कामजीवन ही इतर अनेक सहजप्रवृत्तींप्रमाणे (इन्स्टिंट) एक सहजप्रवृत्ती आहे. या सहज प्रवृत्तीचे वैशिष्ट्य असे की, इतर सहजप्रवृत्तींचा त्याग केला तर माणूस मरतो (उदा. तहान, भूक वगैरे); पण कामजीवनाचा त्याग केला तर माणूस मरत नाही. दुसरे असे की कामजीवन आपल्या अधीन नसते.
लोणचे पाहिले की तोंडात लाळ येते, त्याप्रमाणे श्रृंगार, प्रणय अनुभवला की शरीर कामप्रतिसाद देते; म्हणजे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स) असते. मोक्ष प्राप्तीसाठी कामजीवनाचे बलिदान द्यायचे की निसर्गाची योजना समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचे, हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो.
पुरुषाच्या कामजीवनातील बदल
पुरुषाचा कामप्रतिसाद जीवनाच्या अखेरपर्यंत टिकून राहतो. मात्र त्याचा दर्जा बदलतो. कामसंवेदना टिपणा-या पेशींची संख्या कमी होऊ लागते. या पेशी शिश्नमुंडावर असतात. मेसनर व क्रॉस या संशोधकांच्या नावाने या पेशी ओळखल्या जातात.
पेशींची संख्या घटल्यामुळे कामउद्दीपित व्हायला पुरुषाला वेळ लागतो. एकदा कामउद्दीपन झाले तर ते बराच काळ टिकते. म्हणजे संभोग दीर्घकाळ चालतो; पण संभोगाची रुची कमी कमी होत जाते.
दोन संभोगातील कालमर्यादा वाढते.
त्यामुळे एक संभोगानंतर दीर्घकाळ विश्रांती घेतल्याशिवाय पुन्हा कामउद्दीपन होत नाही. शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी कमी व्हायला लागते. केवळ लैंगिक संबंधातच आनंद सामावला न जाता आता स्त्रीचे सर्वांगीण आकर्षण वाटू लागते.
आता पूर्वी सारख होत नाही.
कामपूर्तीचे (ऑरगॅझम) महत्त्व कमी होऊ लागते. वीर्यस्खलनावेळी वीर्याची पिचकारी लांबवर जात नाही. वीर्य थेंब थेंब गळते. वीर्यातील शुक्राणूची संख्या घटते, पण इतके शुक्राणू प्रजोत्पादनासाठी पुरेसे असतात वीर्याचे प्रमाणही कमी होऊ लागते.
पूर्वी मनात शृंगारिक विचार आले तरी कामउद्दीपन आपोआप व्हायचे, तसे आता होत नाही. उद्दीपनासाठी स्त्रीचे सहकार्य आवश्यक असते. प्रणय, श्रृंगार, स्पर्शाने पुरुषाला तिने कामउद्दीपित करावे लागते. शिश्न ताठ होण्यास बराच वेळ लागतो. मात्र जीवनाच्या अखेरपर्यंत ही क्षमता टिकून राहते.
पुरुषाच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण सावकाश कमी होत असल्यामुळे पुरुषाच्या कामजीवनातील बदलही संथ गतीने होत जातात.
स्त्रीला रजोनिवृत्ती (मेनोपॉज) होते तसा पुरुषाला ‘अॅन्ड्रोपॉज’ होऊ शकतो. त्याला लिंगताठरता कमी प्रमाणात येते. शांत झोप लागत नाही. औदासीन्य येते. केस गळायला लागतात. कमरेभोवती चरबीचा थर साठतो. हाडे ठिसूळ होतात. थकवा येतो. स्वभाव चिडचिडा होतो.
यावर उपाय म्हणजे जसे स्त्रियांना काही गोळ्या देतात तसे पुरुषांना टेस्टोस्टेरॉन देतात. पुरुषनां पण काही गोळ्या देतात ती 6 आठवडे ते 6 महिने पण तत्पूर्वी रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी, रक्ताची पीएस्ए चाचणी व पुरःस्थ ग्रंथीची तपासणी करणे आवश्यक असते.
स्त्रीच्या कामजीवनातील बदल स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजग्रंथीत इस्ट्रोजन हे संप्रेरक निर्माण होते. स्त्रीच्या कामजीवनात या संप्रेरकाला फार महत्व आहे. वयाच्या पंचेचाळीस वर्षांदरम्यान स्त्रीबीजग्रंथीतून स्त्रीबीजनिर्मिती व इस्ट्रोजेननिर्मिती एकाएकी थांबते. त्यामुळे स्त्रीच्या कामजीवनातील बदल झटकन घडून येतात.
चाळिशी उलटली तरी पुरुषाप्रमाणे स्त्रीचाही कामप्रतिसाद टिकून राहतो. जीवनाच्या अखेरपर्यंत स्त्री संभोगक्षम राहू शकते. मात्र पूर्वीप्रमाणे तिलाही कामउद्दीपना सावकाश येते. योनिमार्गाची प्रसरणशीलता कमी होते. कामपूर्तीवेळी होणारे फरक आता कमी होतात. कामपूर्तीत पूर्वीसारखा आनंद मिळत नाही. योनिमार्ग शुष्क होतो. त्याची लवचीकता कमी होते. त्याची लांबीरुंदीही घटते. कामसलिलनिर्मिती पूर्वीइतकी होत नाही.
स्त्रीच्या कामजीवनात वैयक्तिक फरक खूप प्रमाणात आढळतो. पुरुषाचा कामआनंद वयाच्या18 ते 28 वर्षांदरम्यान शिगेला पोचतो; तर स्त्री कामआनंदाची परिसीमा वयाच्या तिशीनंतर गाठत असते. पतीशी भावनिक नाते जुळणे, कामउद्दीपना व कामपूर्ती यांचा अनुभव घेणे यातून तिची संवेदनक्षमता वाढत असते.
योनिमार्ग शुष्क असल्यामुळे स्त्रीला संभोग वेदनादायक होतो. तिच्या स्त्रीबीजग्रंथीतील इस्ट्रोजेन संप्रेरक कमी होत जाते, तसतसे तिच्या अधिवृक्क ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन संप्रेरक स्रवू लागते. या संप्रेरकामुळे तिच्या ओठावर मिशी व हनुवटीवर दाढी येते. याच संप्रेरकामुळे तिची कामइच्छा वाढते. परंतु मुळातच तिची कामइच्छा पुरुषाहून खूप कमी असल्यामुळे ही किंचित वाढ नगण्य ठरते. शिवाय संभोग वेदनामय असल्यामुळे ती संभोगाचे प्रसंग टाळते.
संभोग काम हा पुरुषाच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो, तर स्त्रीला तो एक ऐच्छिक विषय असतो; परंतु काळ पुरुषाची कामवासना पोखरून काढतो व स्त्रीची कामवासना अबाधित राखतो. पुरुषाच्या कामइच्छेला ओहोटी लागते.
तशी स्त्रीच्या कामइच्छेला ओहोटी लागत नाही (मुळात तिला कामइच्छा फार कमी असते). तरीही दोन मुले झाली, चाळिशी उलटली किंवा गर्भाशय काढून टाकला तर ‘आता यापुढे सेक्स बंद’ असा ती हुकूम सोडते. समाजाचीही तशी अपेक्षा असते. संभोगाशिवाय वर्षानुवर्षे ती आनंदाने जगू शकते. पुरुष मात्र पूर्वीपेक्षा कामइच्छा कमी झालेली असली तरी तो अस्वस्थ होतो.
अधून मधून संभोग अनुभवावा असे मनापासून त्याला वाटत असते. पण जागेच्या अडचणीमुळे किंवा पत्नीच्या नकारामुळे संभोगाची संधीच त्याला मिळत नाही. तो हिरमुसतो. दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून हस्तमैथुनाद्वारे कामतृप्ती अनुभवतो.
जी दांपत्ये चाळिशीनंतर कामजीवन अनुभवत नाहीत, त्यांच्या जननेंद्रियांची कार्यक्षमता कमी होत जाते. पुरुषाची लिंग-ताठरता कमी होते व स्त्रीचा योनिमार्ग कोरडा होत जातो. ‘वापरा नाही तर गमवा’ हा निसर्गाचा नियम असतो.
जी दांपत्ये चाळिशीनंतर (रजोनिवृत्तीनंतरही) आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शरीरसंबंध ठेवतात, त्यांना कामउद्दीपन व्यवस्थितपणे होते, दोघांतही कामसलिलनिर्मिती होते व काम आनंदही लाभू शकतो.
सर्वांचेच शरीरसंबंधाचे प्रमाण सारखे असेल असे नाही. कुणी पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकदा शरीरसंबंध ठेवतो. पण मूळ बाब अशी की जीवनाच्या अखेरपर्यंत स्त्री-पुरुष दोघांचीही संभोगक्षमता टिकून राहते.
दोघांतील प्रेमाचे रेशमी बंध जोडणारेही साधन
चाळिशी उलटली म्हणून कुणी कामजीवन टाळावे असे निसर्ग सांगत नाही. कामजीवन हे प्रजोत्पादनाचे एकमेव साधन आहे हे खरे, पण त्याचबरोबर दोघांतील प्रेमाचे रेशमी बंध जोडणारेही साधन आहे. जवळीक निर्माण करणारे आहे, तसे ताणमुक्त करणारे आहे. प्रीती व्यक्त करणारे आहे. तसे तृप्ती देणारे आहे. शिवाय मनोरंजनाचे साधनही आहेच.
वयस्कर दांपत्याने कामजीवनाबाबतीत टाईमटेबल बनवू नये. दोघांचे शरीर सुदृढ असले, मने प्रसन्न असली तर निसर्ग खुणावत असतो.
जवळीक निर्माण होणे फार महत्वाचे हा आनंद अनुभवायचा असेल तर मानसिक ताण नसावा, शरीर सुदृढ ठेवावे.
हिल स्टेशनवर किंवा ट्रिपला जावे, पति-पत्नीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी दोघांनीही प्रयत्न करावा. भांडणे टाळावीत, एकमेकांचे कौतुक, भेटवस्तूंची देवघेव यामुळे जवळीक निर्माण होते.
पुरुषाने मद्यसेवन व धूम्रपान टाळावे. शरीर संबंधा वेळी कामसलिल कमी प्रमाणात असल्यास के वाय जेली, मुखरस, पाणी किंवा जॉन्सन बेबी ऑईल वापरावे. संगीता तील खयाला प्रमाणे एकेक सूर वाढवीत जेवढी उंची गाठता येईल तेवढी गाठून त्यावर तृप्त असावे.
तरुणांनी काही बाबी नक्की लक्षात घ्यावे
तरुणांनी चाळिशी ओलांडलेल्या दांपत्यांना एकांताची संधी द्यावी. रविवारी संध्याकाळी तरुण दांपत्याने मुलांसकट फिरायला गेल्यास घरातील ज्येष्ठ दांपत्यास संधी मिळू शकते.
तसेच स्त्रीने सहकार्य द्यावे. पतीला नाउमेद करू नये. कारण पती हा ‘आपलं’ माणूस असतो. बाबांना बाल्कनीत व आईला स्वयंपाकघरात झोपायला सांगून त्यांची ताटातूट करणे हा ज्येष्ठ दांपत्यावर अन्याय असतो.
जिथे तरुणाईला व वयस्क आपले मन मोकळे करता येईल आणि कुठलीही भीती न बाळगता मदत मागता येईल! अन हे ही संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क
ज्याना प्रत्यक्ष भेटायच आहे ते आपॉइमेंट घेऊन आमच्या पुण्यातील क्लिनिक ला भेट देऊ शकता.
9175477014
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा