शुक्रवार, ११ जुलै, २०२५

स्त्रियांचे कामजीवन

आपण पुरुषांच्या कामजीवनाबद्दल चर्चा करत असतो मात्र स्त्रियांच्या कामजीवनातील आजाराबाबत माहितीच नसते. त्यांची कामपूर्ती हा तर लांबचाच विषय आहे. वैवाहिक जीवन सार्थक होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. संभोगासाठी तिची इच्छा नसते, वारंवार ते टाळणे, हे त्यांच्या काही आजारांचे लक्षणे असू शकतात.

भारतात दर दहा स्त्रियां पैकी एकाला लैंगिक समस्या असते. समस्या असणारी स्त्री डॉक्टरकडे गेल्यावरही नेमक्या शब्दात ती समस्या सांगू शकत नाही. तिचे अज्ञान किंवा आपली संस्कृती ह्यास कारणीभूत असू शकताते. मग ती डॉक्टरांना काय बरे सांगत असेल?
खालील काही लक्षणे ही लैंगिक समस्येची सुचक असू शकतात.
1. सततची पाठदुखी
2. सतत सफेद पाणी जाणे.
3. डोकेदुखी, अंगदुखी (विनाकारण)
4. चिडचिडेपणा
स्त्रियांतील आजारात प्रामुख्याने दोन आजार असतात. #डिस्पेर्यूनिया व #योनिमार्जन.
पवन व गिता ह्यांच्यात खूप भांडणे होत आहेत. त्याच्या लग्नाला तीन महिने पूर्ण होत आलेली आहेत. ते एकमेकांवर अतिशय प्रेम करतात. त्यांच्यात संभोग होऊ शकत नव्हता. पवन, ‘‘डॉक्टर, ही मला प्रतिसाद देते. तिची इच्छा असते. पण मी अति उत्तेजित झाल्यावर ऐन वेळेस दूर लोटते. असं वारंवार होत आहे. मला खूप चीड येते.’’
मी त्याला बाहेर जायला सांगितले व विमल शी बोलत होतो. विमल एकदम भावुक होऊन रडायला लागली. ती म्हणाली, ‘‘मला ह्याचे खूप दु:ख वाटते. मी दरवेळेस असं होणार नाही ठरवते देखील पण लिंग योनीमार्गात प्रवेश करेल त्या आधीच खूप दुखायला लागते, मग अगदी नाईलाजास्तव मला त्याला दूर लोटावे लागते. मी मोठय़ा आशेनी आली आहे. सर तुमच्या कडे माझी समस्या घेऊन कृपया मला योग्य सल्ला द्या’’
विमल ला मी आश्वासन दिले, ती लवकरच व्यवस्थित होणार व काही महिन्यांच्या उपचाराने ती झालीही. तिला #डिस्पेर्युनिया झाला होता.
संभोगांच्या आधी, दरम्यान किंवा नंतर योनिमार्गात किंवा ओटीपोटात खूप दुखते, त्यामुळे संभोग होऊ शकत नाही, त्याला #डिस्पेर्यूनिया म्हणतात. जळजळ होणे, खेचणे, ठणकणे किंवा कापले गेल्याची अनुभूती होणे ह्यापैकी एक असं ते दुखणं असतं. 10-28% स्त्रियांना हे जीवनातील कोणत्याही अवस्थेत होऊ शकते.
शारीरिक कारणात योनीत होणारे इन्फेक्शन असू शकते.
मानसिक कारणात संभोगापूर्वीची अपूर्ण क्रिया (foreplay), योग्य योनीस्त्राव नसणे (vaginal dryness), संभोगाची भीती हे असतात. मेनोपॉजच्या काळात हार्मोन्स कमी होऊन अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
असच, काही दिवसा पूर्वी डॉ.अर्चना ह्यांनी माझ्याकडे भुमी ला समुपदेशनासाठी पाठविले. डॉ.अर्चना म्हणाल्यां, ‘‘भुमी ही विवाहित 22 वर्षाची आहे. हिला संभोग करण्यात त्रास आहे. मी तिची तपासणी करत असताना ती योनीमार्गाची तपास करताना घाबरून किंचाळत होती. तिला दुखणं नव्हतं. तिचे योनिमार्गाचे स्नायू कडक होते. तिच्या त्रासाला #योनिमार्जन (#vaginismus) म्हणतात. समुपदेशनाची गरज आहे.’’
ठरल्याप्रमाने भुमी व तिचा नवरा यांनी माझी भेट घेतली.
यात योनिमार्गातील स्नायू कडक होतात व परिणामता शिश्न प्रवेश करू शकत नाही. हे स्नायू कडक होणे स्त्रीच्या अनैच्छिक असते. थोडासा दुखूही लागते पण समागम अशक्यच होते. ह्या स्थितीची वेगवेगळी कारणे आहेत. त्यात मानसिक कारणे जास्त आहेत. योनी लहान आहे अशी गैरसमजूत असणे, संबंधाबद्दलचे अज्ञान, संबंधाने खूप दुखते व योनीला हानी होते अशी गैरसमजूत, जुने लैंगिक छळ, गरोदर होण्याची भीती व नात्यातील ताणतणाव असे काही कारण असतात.
लहानपणापासूनच जननेंद्रियांबाबत तुच्छतेने बोलले जाते. म्हणून सेक्स हे वाईट असते अशी भावना ब-याच लोकांची होते. म्हणूनही वरील लैंगिक समस्या उद्भवतात.
योनिमार्जनात शरीराला दुखेल व हानी पोहोचेल ही विचारधारणा होते व आपोआप योनी स्नायूचे आकुंचन होते व ते कडक होतात. त्यामुळे समागम होऊ शकत नाही आणि ही सायकल पूर्ण होते. मग त्या स्त्रीची कामेच्छा नाहीशी होते. काही आसन व समुपदेशन ह्यांनी ह्या आजारातून मुक्ती मिळू शकते. अर्थपूर्ण कामक्रीडा संभव होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा