शुक्रवार, ११ जुलै, २०२५

मधुमेही काम जीवन

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लैंगिक दुर्बलतेची तक्रार सामान्य माणासांच्या मानाने तीन पटीने अधिक दिसून येते. मात्र आपल्याला मधुमेह झाला आहे म्हणजे आता आपले कामजीवन संपुष्टात आले आहे, असा समज करून घेणे हे मधुमेहापेक्षा कामजीवनावर अधिक घातक परिणाम करू शकते.

मधुमेहाचा परिणाम शरीराच्या सर्वच रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूवर होतो. पुरुषाच्या शिश्नात समागम करण्यासाठी गरजेची असलेली ताठरता येण्यासाठी मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या दोन्ही सशक्त आणि कार्यक्षम असणे गरजेचे आहे. मेंदूच्या तळाशी असलेल्या हायपोथलॅमस या भागामध्ये सेक्स केंद्र असते. मनात लैंगिक भावना निर्माण होताच हायपोथलॅमसमधून मज्जातंतूमार्फत जननेंद्रियांकडे संकेत पाठवले जाऊ लागतात. हे संकेत पोहोचताच शिश्नामध्ये रक्त भरले जाण्याची प्रक्रिया सुरू होते, जितके रक्त भरले जाईल, तितके शिश्न ताठ होत जाते.
मधुमेहामध्ये या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. मधुमेहाचा परिणाम सर्व रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूवर होत असतो. शिश्न ताठ होण्याची पूर्ण प्रक्रियाच मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याने सहाजिकच मधुमेहाचा परिणाम शिश्नाच्या ताठ होण्यावर घडू शकतो. हा परिणाम अचानक मात्र घडत नाही. मधुमेहाची सुरुवात झाल्यावर लैंगिक क्षमतेवर असा परिणाम घडून येण्यासाठी काही अवधी जावा लागतो. आपल्याला मधुमेहाची सुरुवात झाली आहे हेच जर व्यक्तीच्या ध्यानात आले नसेल आणि त्यामुळे त्यासाठी लागणारी उपाययोजनाच जर व्यक्तीने केली नसेल तर मात्र मधुमेह मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांवर सुप्तपणे आघात करत राहतो. या आघाताचे दुष्परिणाम व्यक्तीच्या ध्यानात येईपर्यंत खूप काळ जातो आणि व्यक्तीची लैंगिक क्षमता कमी होऊ लागते.
मधुमेहाचा परिणाम मज्जातंतूवर झाल्यास त्याला ‘न्युरोपॅथी’ असे म्हणतात. मधुमेहामुळे होणाऱ्या न्युरोपॅथीमध्ये मज्जातंतूवर जे परिणाम होतात, ते बऱ्याच अंशी कायम स्वरूपाचे असतात, पण असे असले तरी न्युरोपॅथी उद्भवण्याच्या सुरुवातीच्या काळात जर बी जीवनसत्त्वाचे मोठे डोस रुग्णाला दिल्यास त्याचा चांगला गुण येतो. मात्र असे डोस रुग्णाने स्वत:हून घेऊ नयेत.
आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या किंवा शंका असतील तर आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता.
सहारा आयुर्वेदा, पुणे.
9890007014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा