योनीमार्ग हा एक प्रसरणक्षम असा, साधारणपणे 3 ते 4 इंच खोल असा मार्ग असतो. योनी हा अनेक स्नायूंनी बनलेला एक लवचिक लैंगिक अवयव आहे. योनीची मुख्यरचना शरीराच्या आतमध्ये असते. योनीची लांबी म्हणजे योनीमुखापासून ग्रीवेपर्यंतची लांबी साधारणतः 3 ते 4 इंच असते. योनीचा आकार म्हणजे बाहेरील भाग साधरण 1.5 ते 3 इंच असतो. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत आकार आणि लांबी समानच असेल असं अजिबात नाही. शिवाय बाळाच्या जन्माच्यावेळी योनीमार्गाचा आकार नेहमीपेक्षा अनेकपटीने मोठा होत असतो.
योनीत लिंग किती घालावे?
खरंतर, योनीत लिंग किती आत घालावे, सेक्स किती वेळ करावा हे सेक्स करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र मिळून ठरवण्याच्या गोष्टी आहेत.
आपण हे समजून घेतले पाहिजे की, लिंग जास्त आत गेले म्हणजे जास्त लैंगिक समाधान मिळते हाच मुळात एक गैरसमज आहे.
संभोगाच्या वेळी स्त्रीच्या योनिमुखापासूनचा 2 इंच योनीचा भाग फुगून त्या भागा ला लिंगांचे जास्त घर्षण होत असते.
योनीच्या आतल्या भागात संवेदनशीलता कमी असते. म्हणूनच योनिमैथून करताना पुरुषाचे उत्तेजित लिंग दोन इंच असेल तरीही स्त्रीला पूर्ण लैंगिक सुख मिळू शकते.
लैंगिक सुख हे किती वेळ संभोग केला किंवा लिंग योनीत किती आत गेले यावर अवलंबून नसून लैंगिक ज्ञान, संवाद, आदर, संमती, विश्वास, नाविन्य, वातावरण निर्मिती, यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
सहारा आयुर्वेदा, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा